राजकीय

कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का...

Shiv Senas big blow to Congress in Kolhapur


By nisha patil - 8/12/2025 11:46:49 AM
Share This News:



 कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आज शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. माजी महापौर सौ. सई खराडे, त्यांचे पुत्र शिवतेज खराडे आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला.

सई खराडे यांनी दोन वेळा मनपात प्रतिनिधित्व केले असून, त्या कोल्हापूरच्या बोंद्रे-खराडे घराण्याशी संबंधित प्रतिष्ठित नेते परिवारातील आहेत. शिवतेज खराडे हे शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक उमेदवार असून, इंद्रजीत आडगुळे हे माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव आहेत. तिघांच्या प्रवेशामुळे कोल्हापूरातील शिवसेनेची ताकद वाढणार आहे. यावेळी माजी आमदार सुजित मिनचेकर उपस्थित होते.


कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का...
Total Views: 34