विशेष बातम्या
पन्हाळगडावर शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार
By nisha patil - 6/6/2025 9:02:11 PM
Share This News:
पन्हाळा, ६ जून – किल्ले पन्हाळगडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सुरुवात झाली.
भगव्या ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर नगारा वाजवत शिवराज्याभिषेक सोहळा सुरू झाला. शिवमूर्तीला पंचामृत व पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक, आरती, मर्दानी खेळ, ढोल-ताशांच्या मिरवणुकीत पालखी सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन दिनेश साळोखे यांनी केले. उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, बाजीराव पाटील, महिला आघाडीच्या प्रतिज्ञा उत्तुरे, युवा सेनेचे मनजीत माने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. जयघोषात पन्हाळगड दुमदुमला.
पन्हाळगडावर शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार
|