विशेष बातम्या
पन्हाळगडावर शिवसेनेचा शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा
By nisha patil - 6/6/2025 3:42:38 PM
Share This News:
पन्हाळगडावर शिवसेनेचा शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा
शिवमंदिर ते अंबाबाई मंदिर – पालखी सोहळ्याने गड झाला शिवमय
पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक दिन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता ध्वजपूजनानंतर महाराजांच्या उत्सवमूर्तीचा जलाभिषेक, दुग्धाभिषेक व पूजा झाली. यानंतर हलगी-तुतारीच्या गजरात पारंपरिक मर्दानी खेळ झाले. शिवमंदिर ते अंबाबाई मंदिरापर्यंत भव्य पालखी सोहळा निघाला.
या कार्यक्रमाचे पौरोहित्य जय भोरे यांनी केले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, दिनेश साळोखे, राहुल माळी, प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे, आणि इतर अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषात गड शिवमय झाला होता.
पन्हाळगडावर शिवसेनेचा शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा
|