बातम्या
प्रभाग यादीतील भल्यामोठ्या गोंधळावर शिवसेनेचा आयुक्तांना थेट सवाल–जवाब
By nisha patil - 11/24/2025 4:14:06 PM
Share This News:
प्रभाग यादीतील भल्यामोठ्या गोंधळावर शिवसेनेचा आयुक्तांना थेट सवाल–जवाब
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रभाग प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले.
याद्यांमध्ये प्रभाग बदलातील विसंगती, दुबार नोंदी, तसेच ग्रामीण भागातील मतदारांची चुकीची नोंद आढळत असल्याने त्या तात्काळ सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात सर्व हरकती प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांची योग्य शहानिशा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
प्रभाग यादीतील भल्यामोठ्या गोंधळावर शिवसेनेचा आयुक्तांना थेट सवाल–जवाब
|