राजकीय

कोल्हापुरात शिवसेनेचा पहिला महापौर निश्चित! – आम. राजेश क्षीरसागर

Shiv Senas first mayor confirmed in Kolhapur


By nisha patil - 5/26/2025 4:58:30 PM
Share This News:



कोल्हापुरात शिवसेनेचा पहिला महापौर निश्चित! – आम. राजेश क्षीरसागर

35 माजी नगरसेवकांचा लवकरच शिंदे गटात प्रवेश;

 येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेचा (शिंदे गट) पहिला महापौर निश्चित होईल, असा ठाम विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. शहरातील 35 माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असून, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही जणांचा प्रवेश अधिकृतपणे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली."शिवसेनेने माझ्या नेतृत्वाखाली दोन वेळा महापालिका निवडणुका लढवल्या. 

आमचे प्रयत्न प्रामाणिक होते, मात्र काही गोष्टी कमी पडल्या. यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः कोल्हापुरावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे यावेळी कोणतीही कमतरता राहणार नाही आणि निश्चितच कोल्हापुरात शिवसेनेचा पहिला महापौर मिळवू," असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.शहर विकासासाठी महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी पूर्वीच्या पालकमंत्र्यांवर सडकून टीका केली. "ज्यांच्या काळात सत्ता होती, त्यांनी शहरासाठी नेमकं काय केलं? आज महायुती सरकारने पायाभूत सुविधांसाठी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे शहरातील अनेक नेते, माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत आहेत," असेही ते म्हणाले.


कोल्हापुरात शिवसेनेचा पहिला महापौर निश्चित! – आम. राजेश क्षीरसागर
Total Views: 153