बातम्या
कागलमध्ये शिवसेनेची नवी जबाबदारी; जयसिंग टिकले यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड!
By nisha patil - 11/18/2026 3:05:30 PM
Share This News:
कागलमध्ये शिवसेनेची नवी जबाबदारी; जयसिंग टिकले यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड!
प्रतिनिधी अजित बोडके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कागल विधानसभा उपजिल्हाप्रमुखपदी जयसिंग टिकले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कागल विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल जयसिंग टिकले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पक्षातील वरिष्ठ नेते, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना टिकले म्हणाले की, ही निवड म्हणजे केवळ एक पद नसून शिवसेनेच्या विचारांशी असलेल्या निष्ठेची आणि आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती आहे. त्याचबरोबर भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची मोठी जबाबदारीही आहे. सामान्य शिवसैनिकांच्या अडचणी, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहणार आहोत. कागल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पदाचा अभिमान बाळगण्यापेक्षा पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हेच आपले ध्येय आहे. जनतेचा विश्वास हीच आपली ताकद असून जनतेची सेवा हीच आपली बांधिलकी आहे, असेही जयसिंग टिकले यांनी सांगितले. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी नव्या जोमाने काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये शिवसेनेची नवी जबाबदारी; जयसिंग टिकले यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड!
|