राजकीय

हातकणंगलेत शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली...

Shiv Senas power show rally in Hatkanangale


By nisha patil - 11/25/2025 12:21:18 PM
Share This News:



हातकणंगले -: हातकणंगले नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजितसिंह रामगोंडा पाटील यांच्या प्रचाराला आज जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेल्या रॅलीत अजितसिंह पाटील यांनी मार्गक्रमण करत मतदारांशी संवाद साधला.

रॅलीदरम्यान, लाडक्या बहिणींनी जागोजागी औक्षण करून आणि फुलांची उधळण करत उमेदवारांचे अतिशय ऊबदार स्वागत केले. नागरिकांनी आणि महिलांनी दाखवलेल्या या प्रेमामुळे शिवसेनेचा हातकणंगलेत विजय निश्चित असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

यानंतर झालेल्या सभेत बोलताना पाटील म्हणाले की, हातकणंगले नगर परिषदेची ६३ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लावू. तसेच उत्तम रस्ते, आरोग्य केंद्र, बागा-उद्याने, अभ्यासिका अशा सर्व सुविधा शहरात उभारण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

“आम्ही दिलेला शब्द पाळणारी मंडळी आहोत. नागरिकांच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


हातकणंगलेत शिवसेनेची शक्तीप्रदर्शन रॅली...
Total Views: 13