ताज्या बातम्या

भुदरगड तालुक्यात शिवसेनेची एकजुटी; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत विजयासाठी सज्जता

Shiv Senas unity in Bhudargad taluka Ready for victory in Zilla Parishad Panchayat Samiti elections


By Administrator - 1/17/2026 2:58:12 PM
Share This News:



भुदरगड, कोल्हापूर:- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांनी केले.
बैठकीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच नगरपालिकांमध्ये मिळालेले यश संघटनेच्या एकजुटीचे फलित असल्याचे स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम करण्याचे आवाहन केले. “जिल्ह्यात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. लोकांशी थेट संवाद साधत गावपातळीवर प्रामाणिकपणे काम करा. भुदरगडमधून सुरू झालेल्या लढतीत एकमताने विजयाचा झेंडा रोवायचा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी सांगितले की बुद्धीभेद बाजूला ठेवून सर्वांना संधी दिली जाईल, काम आणि मेरीट हाच निकष राहील. आळस टाळून ही निवडणूक यशस्वी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत जेष्ठ नेते श्री. बी.एस.देसाई (अण्णा), श्री. के.जी. नांदेकर, श्री. नंदकुमार ढेंगे, श्री. कल्याणराव निकम, श्री. मदनदादा देसाई, श्री. सुर्याजीराव देसाई, श्री. निवासराव देसाई, श्री. डी.बी. जाधव सर, श्री. अशोकराव भांदीगरे, श्री. अंकूश चव्हाण, श्री. बाळासाहेब भोपळे, श्री. संदीपराव वरंडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संग्राम सावंत, श्री. जयवंतराव चोरगे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष श्री. विक्रम पाटील, श्री. धैर्यशिल भोसले सरकार, श्री. तात्या पाटील, माजी सभापती श्रीमती किर्तीताई देसाई, श्रीमती आक्काताई नलवडे, श्री. बाजीराव चव्हाण आणि इतर प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.


भुदरगड तालुक्यात शिवसेनेची एकजुटी; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत विजयासाठी सज्जता
Total Views: 71