बातम्या
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा
By nisha patil - 4/29/2025 5:21:06 PM
Share This News:
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा
डॉ. दशमीता जाधव आणि सौ. वैशाली क्षिरसागर यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव संपन्न
शिवजयंती सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती, शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
निश्चयाचे महामेरू, अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती...! शिवरायांच्या जयंतीनिमित्त संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवजन्मकाळ सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा शिवजन्मोत्सव आमदार जयश्री चंद्रकांत आण्णा जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ दशमीता सत्यजीत जाधव आणि प्.म. देवस्थान माजी कोषाध्यक्षा वैशाली राजेश क्षिरसागर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वं शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा दिल्या. दरम्यान, उपस्थित महिलांना ओटीचे वाटप करण्यात आले. या शिवजन्मोत्सव सोहळ्यास माधवी गवंडी, पवित्रा रांगणेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठ मंडळाचे कार्यकर्ते, शिवजयंती उत्सव कमिटीचे सदस्य, महिला बंधू-भगिनी, शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा
|