बातम्या

 विद्यामंदिर माजगाव येथे शिवकालीन मर्दानी खेळ शिबिरास सुरुवात

Shiva era mens sports camp begins at Vidyamandir Majgaon


By nisha patil - 4/29/2025 5:18:46 PM
Share This News:



 विद्यामंदिर माजगाव येथे शिवकालीन मर्दानी खेळ शिबिरास सुरुवात
 

शिवकालीन परंपरा जपणारे शिबिर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

विद्यामंदिर माजगाव शाळेमध्ये इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन मर्दानी खेळांचे शिबिर आयोजित करण्यात आलंय. या शिबिरात दानपट्टा चालवणे, लाठी-काठी, लेझीम यांसारख्या पारंपरिक खेळांचा सराव करण्यात येणार आहे.

शिबिराचा कालावधी २८ एप्रिल २०२५ ते ३ मे २०२५ असा असून, सचिन परीट सर यांचे या शिबिराला विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक मर्दानी खेळांची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यात शारीरिक कौशल्य वाढवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. शिबिराचे उद्घाटन सुतार (सरपंच, माजगाव) यांच्या हस्ते पार पडले. त्यांच्यासमवेत चौगले (डेप्युटी सरपंच, माजगाव), पाटील (सदस्य, ग्रामपंचायत माजगाव), कांबळे  (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) तसेच अन्य सदस्यही उपस्थित होते.


 विद्यामंदिर माजगाव येथे शिवकालीन मर्दानी खेळ शिबिरास सुरुवात
Total Views: 113