बातम्या
धर्मवीर छ. श्री. संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
By nisha patil - 5/16/2025 3:08:37 PM
Share This News:
धर्मवीर छ. श्री. संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर – धर्मवीर छ. श्री. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उभा मारुती चौक येथे श्री शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेस भाजपचे प्रदेश सचिव मा. महेश बाळासाहेब जाधव यांनी भेट दिली.
या प्रसंगी अशोक देसाई, अजित खराडे, रविकिरण इंगवले, राहुल इंगवले, लालासाहेब गायकवाड, पापा भोसले, प्रताप देसाई तसेच शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवामध्ये राष्ट्रभक्ती आणि इतिहासाची जाणीव जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- जनसंपर्क कार्यालय, मा. महेश बाळासाहेब जाधव, कोल्हापूर
धर्मवीर छ. श्री. संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
|