शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठातील कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांविषयी पारदर्शकतेची मागणी

Shivaji University


By nisha patil - 5/9/2025 11:33:22 AM
Share This News:



शिवाजी विद्यापीठातील कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांविषयी पारदर्शकतेची मागणी

हिंदू जनसंघर्ष समितीकडून कुलगुरूंना निवेदन, RTI व PIL ची इशारा

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठात शिपाई, झाडू कामगार, बागकाम कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात हिंदू जनसंघर्ष समिती, कोल्हापूर तर्फे कुलगुरूंना निवेदन देण्यात आले असून, कर्मचाऱ्यांची संख्या, नियुक्ती प्रक्रिया, ठेकेदारांची माहिती, वेतन पद्धती व करारातील अटी याबाबत पारदर्शक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, काही कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने ठरविलेल्या ₹13,000 पेक्षा जास्त किमान वेतनाऐवजी फक्त ₹10,000 च्या आसपास पगार दिला जातो. तोही रोख स्वरूपात देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पगार पावत्या किंवा बँक व्यवहाराचा पुरावा न दिल्याने हा गंभीर आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


शिवाजी विद्यापीठातील कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांविषयी पारदर्शकतेची मागणी
Total Views: 68