राजकीय

शिवाजी विद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धा श्री शहाजी छ. महाविद्यालयात संपन्न

Shivaji University Body Building Competition concluded at Shri Shahaji Ch College


By Administrator - 2/14/2026 7:02:47 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धा श्री शहाजी छ. महाविद्यालयात संपन्न


कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये सांगली, सातारा व कोल्हापूर येथील 42 महाविद्यालयातील 67 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे महामंत्री डॉ. धनंजय पाटील, शहाजी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. आर. जे. भोसले, अधीक्षक श्री. एम. व्हि. भोसले, निवड समितीचे डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. विशाल साळुंखे व डॉ. महादेव सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच श्री. रामकृष्ण चितळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. विजय मोरे, श्री. राजेश वडाम, श्री. राहुल परीट व सहकाऱ्यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन प्रा. डॉ प्रशांत पाटील यांनी केले.
 स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे... 60 किलो 1) प्रतीक मगदूम (डीकेएएससी कॉलेज, इचलकरंजी) 2) आयुष शेट्टी (व्यंकटेश कॉलेज, इचलकरंजी) 3) ऋत्विक शिंत्रे (नाईट कॉलेज, इचलकरंजी), 65 किलो 1) तुषार शिंदे (एसीएस कॉलेज, आष्टा) 2) किरण गायकवाड (व्ही पी कॉलेज, कळे) 3) केदार सातपुते (शहाजी कॉलेज, कोल्हापूर), 70 किलो 1) शुभम कदले (जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर) 2) ओंकार मिसाळ (शहाजी कॉलेज, कोल्हापूर) 3) संकेत दाडगोळ (शाहू कॉलेज, कोल्हापूर), 75 किलो 1) प्रदीप माळी (डी के टी ई इचलकरंजी) 2) आदित्य भुइंगडे (व्ही पी कॉलेज, कळे) 3) अफान शेख (एल बी एस कॉलेज, सातारा), 80 किलो 1) मयूर जाली (केडब्ल्यूसी, सांगली) 2) केदार शिंदे (डी वाय पी, तळसंदे) 3) प्रथमेश घाडगे (केडब्ल्यूसी, सांगली), 85 किलो 1) यश कोरी (शिवराज कॉलेज, गडहिंग्लज) 2) अभिषेक भोसले (बडे कॉलेज, पुनाळ) 3) पार्थ जाधव (व्यंकटेश कॉलेज, इचलकरंजी), 85 किलो वरील 1) शिवमय चौगुले (नाईट कॉलेज, इचलकरंजी) 2) सोनू कचरे (बळवंत कॉलेज, विटा)
   वरील सुवर्णपदक विजेत्यांची निवड दिनांक 2 ते 5 मार्च रोजी आंध्र युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धा घेण्यासाठी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.


शिवाजी विद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धा श्री शहाजी छ. महाविद्यालयात संपन्न
Total Views: 19