शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशालेची विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी

Shivaji University School of Engineering and Technology


By nisha patil - 10/16/2025 10:58:17 AM
Share This News:



कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद 2025–26 अंतर्गत राधानगरी महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्थेचे शाहू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑक्टोबर रोजी आयोजित विभागीय जलतरण स्पर्धेत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशाला (तंत्रज्ञान अधिविभाग) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. 
यामध्ये झालेल्या  विविध जलतरण खेळ प्रकारात धैर्यशील भोसले यांनी 8 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कांस्य असे एकूण १३ पदके मिळवून ‘सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटू’ हा मान पटकावला. तसेच सिद्धेश शेलार यांनी एक सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठास जनरल चॅम्पियनशिप प्राप्त झाली आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी शिवाजी विद्यापीठाचे माननीय प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांचे प्रोत्साहन मिळाले आणि माननीय कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. ए. बी. कोळेकर व क्रीडा समन्वयक प्रा. प्रविण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.


शिवाजी विद्यापीठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशालेची विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी
Total Views: 47