बातम्या
शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभाग मार्फत आंतर विभागीय बास्केटबॉल पुरुष स्पर्धेचे आयोजन
By nisha patil - 11/23/2025 6:18:57 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभाग मार्फत आंतर विभागीय बास्केटबॉल पुरुष स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर: दिनांक 21 व 22 नोव्हेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभागाच्या वतीने शहाजी लॉ कॉलेज या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय बास्केटबॉल पुरुष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील एकूण बारा संघ पात्र ठरले होते.
सदर स्पर्धेच्या उद्घाटना समारंभ प्रसंगी कौन्सिल ऑफ एज्युकेशन सचिव माननीय विश्वनाथ मगदूम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यासोबत अधिष्ठाता आणि डीआर के कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या माननीय डॉ वर्षा मैंदर्गी ,शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य, डॉ. प्रवीण पाटील, बास्केटबॉल पुरुष निवड समितीचे चेअरमन डॉ नंदकुमार पाटील, सदस्य डॉ आकाश बनसोडे, डॉ समीर पवार, स्पर्धा निरीक्षक डॉ सुरेश फराकटे , डॉ संजय पाटील , आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेमधून पुढील महिन्यात नांदेड येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सव 2025 आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे. प्रा. किरण पाटील, प्रा. सुचय खोपडे, केदार सुतार , अमित दलाल, सुनील देसाई, आमिर मुल्ला, सूरज वाघेला , अजित तिवडे यांनी संयोजन केले.
आज झालेल्या सामन्यांमधून न्यू कॉलेज कोल्हापूर, नाईट कॉलेज कोल्हापूर,मिरज महाविद्यालय मिरज आणि विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवाडगाव यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभाग मार्फत आंतर विभागीय बास्केटबॉल पुरुष स्पर्धेचे आयोजन
|