बातम्या
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025 मध्ये शिवाजी विद्यापीठाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळवून धडाकेबाज सुरुवात केली आहे.
By nisha patil - 11/28/2025 5:27:47 PM
Share This News:
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025 मध्ये शिवाजी विद्यापीठाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळवून धडाकेबाज सुरुवात केली आहे.
राजस्थान मधील एकूण ७ शहरांमध्ये ५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ सुरू असून यामध्ये पाच हजार प्लस खेळाडू भारतातील २०० विद्यापीठामधून सहभागी झाले आहेत. यामध्ये एकूण २३ क्रीडाप्रकार व एक प्रायोगिक तत्त्वावर खो-खो हा खेळ असे एकूण २४ खेळांची स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १० खेळ प्रकारात सहभाग असून यामध्ये ८७ खेळाडू १७ संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक आणि प्रा. डॉ. एन डी पाटील हे विद्यापीठाचे पथक प्रमुख म्हणून सहभागी झाले आहेत. या स्पर्धा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमधील जे पहिले ८ संघ असतात त्यांच्यामध्येच असल्याने अत्यंत चुरशीची व ऑलम्पिक च्या दृष्टीने पहिली पायरी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. शिवाजी विद्यापीठाने पहिल्या तीन दिवसात या स्पर्धेवर आपली छाप ठेवले आहे व झेंडा फडकवत ठेवलेला आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर अखेर ही स्पर्धा चालणार असून शिवाजी विद्यापीठाचे २४ पासून ५ तारखेपर्यंत विविध खेळात खेळाडू सहभागी होत आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात कुमारी काजोल सरगर हिने सुवर्णपदकासह विद्यापीठाचे खाते उघडले.
त्यानंतर आज मुलांच्या १० मी एअर रायफल शूटिंग संघाने ब्राॅझ मेडल मिळवले संघामध्ये प्रतीक जोंग, अथर्व पाटील व रणवीर काटकर या खेळाडूंचा समावेश होता. त्याचबरोबर आर्चरी पुरुष वैयक्तिक रिकव्हर (50 मीटर) प्रकारात साहिल शेलार याने सिल्वर मेडल मिळवले तर अत्यंत चुरशीने झालेल्या पुरुष रिकव्हर टी-इव्हेंटमध्ये शिवाजी विद्यापीठ विरुद्ध लवली प्रोफेशनल विद्यापीठ अत्यंत चुरशीच्या सामन्यात अवघ्या एक गुणाने 58 – 57 असा अंतिम सेट लवली प्रोफेशनल जिंकल्यामुळे शिवाजी विद्यापीठास रौप्य पदक प्राप्त झाले. या संघामध्ये मयूर रोकडे, साहिल शेलार, आदित्य जाधव व प्रणव मालवेकर या खेळाडूंचा समावेश होता.
त्याचबरोबर आपली अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू आदित्य स्वामी ही वैयक्तिक कंपाउंड गटात अंतिम फेरीत पोचली असून तिचा उद्या सकाळी अंतिम फेरीचा सामना आहे. रग्बी मुला–मुलींचे संघ उप उपांत्य फेरीत पोहोचले असून त्यांचे सामने ही उद्या सकाळी होणार आहेत.
कुस्ती प्रकारात आपल्या विद्यापीठाची पैलवान सृष्टी भोसले व समृद्धी घोरपडे यांनी आपापल्या वजनी गटामध्ये ब्राॅझ पदक पटकावले. सायकलिंग विभागात ट्रॅक इव्हेंट उद्यापासून सुरू होत आहेत.आपल्या पदकांसाठी हक्काचा ॲथलेटिक्स हा प्रकार १ ते ४ डिसेंबर रोजी आहे व कनोईंग कयाकिंग उदयपूर येथे दि. २ ते ४ डिसेंबर रोजी आहे.
त्यामुळे गेल्या ४ दिवसात शिवाजी विद्यापीठाने १ सुवर्ण, २ रौप्य व ३ ब्राॅझ मेडल कमाई करून आपले खाते उघडले आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाचा ओव्हरऑल संघ २०० विद्यापीठामधून दहाच्या आत स्थान मिळेल या दृष्टीने नियोजन व खेळाडूंचा परफॉर्मन्स होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, पथक प्रमुख डॉ. एन डी पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व सहभागी प्रशिक्षक संघ व्यवस्थापक डॉ सुनील खराडे,डॉ. प्रशांत पाटील, डॉ. धनंजय पाटील, डॉ प्रताप जाधव, डॉ निलेश पाटील, डॉ इब्राहिम मुल्ला, डॉ आकाश बनसोडे, डॉ टी आर साबळे, डॉ विक्रम सिंह नांगरे पाटील, डॉ शीला मोहिते, श्री रामचंद्र पाटील, श्री शिवाजी दाभाडे , श्रीमती वर्षा शिंदे, श्री दीपक पाटील,श्री सचिन जाधव, श्री सुहास वाघ, श्री अजय मराठे.यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025 मध्ये शिवाजी विद्यापीठाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळवून धडाकेबाज सुरुवात केली आहे.
|