बातम्या
शिवाजी विद्यापीठ रंगलं काव्यात!
By nisha patil - 12/23/2025 5:49:32 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठ रंगलं काव्यात!
शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभाच्या पूर्वसंध्येला विश्वविक्रमी कविता सादरकर्ते विसुभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या एकपात्री काव्यनाट्यानुभवाने विद्यापीठ परिसर भावनांनी भरून गेला. विद्यापीठातील तसेच बाहेरील अनेक रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
सुमारे दोन तास चाललेल्या या सादरीकरणात बापट यांनी काव्य, विनोद आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी ग्रंथ व स्मृतिचिन्ह भेट देऊन विसुभाऊ बापट यांचा सन्मान केला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ रंगलं काव्यात!
|