बातम्या
अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा पुरूष संघ जाहीर
By Administrator - 1/30/2026 2:55:56 PM
Share This News:
अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा पुरूष संघ जाहीर
कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: अमरावती (महाराष्ट्र) येथे दि. १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल पुरुष स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून तो स्पर्धेसाठी रवाना झाला.
शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर गेले आठ दिवस विशेष एकत्रित सराव शिबिर झाले. संघात एकूण १६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला. त्यात रोहन बाबर (कर्णधार), वैभव गाडे, अनिकेत गुजले, आशुतोष मिश्रा, विश्वजीत ठोंबरे, प्रेम लालबेग, श्रुतीक पाटील, प्रथमेश गोरे, संस्कार माळी, पार्थ शिंदे, अनिकेत कदम, पृथ्वीराज अर्जुन, निलेश रिळेकर, ओमकार नेर्लेकर, राजवर्धन पाटील, तुषार बाबर, यांचा समावेश आहे. प्रशिक्षकपदी प्रा.विनायक जाधव यांची निवड झाली. संघाला प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.
अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा पुरूष संघ जाहीर
|