शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठात ‘शिक्षण–उद्योग–शासन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Shivaji University organizes Education Industry Governance International Conference


By nisha patil - 1/17/2026 2:56:38 PM
Share This News:



कोल्हापूर:- नवोपक्रम, स्टार्टअप्स आणि संशोधनाला चालना देत विकसित भारत २०४७ हे ध्येय साध्य करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे दोन दिवसीय भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, २० जानेवारी व बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी होणारी ही परिषद
“अकॅडेमिया, इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2.0” या नावाने आयोजित करण्यात येणार आहे
.

या परिषदेत शिक्षण, उद्योग, शासन व संशोधन क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असून नव्या कल्पनांना व्यावसायिक रूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

आंतरराष्ट्रीय सहभाग

या कॉन्क्लेव्हमध्ये अमेरिका, मलेशिया, व्हिएतनामसह विविध देशांतील ६ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, तसेच देशातील नामांकित खासगी विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शास्त्रज्ञ, यशस्वी उद्योजक व शासनाचे वरिष्ठ अधिकारी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेत होणारे प्रमुख उपक्रम :

नाविन्यपूर्ण उत्पादने व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

उद्योजकांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन सत्रे

Innovation & Quality Meet

संशोधन व पेटंट सादरीकरण

शार्क टँक पिचिंग स्पर्धा

पेटंट गॅलरी व स्टार्टअप स्टॉल्स

पोस्टर स्पर्धा व संशोधन सादरीकरण

भव्य बक्षीस व Seed Funding

या परिषदेत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना एकूण ₹१५ लाखांपर्यंत Seed Funding / बक्षीस निधी दिला जाणार आहे.
उद्योजक, स्टार्टअप्स, विद्यार्थी व संशोधकांसाठी ही परिषद एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

शिक्षण, उद्योग व शासन यांचा प्रभावी समन्वय साधणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब असून नव्या पिढीच्या नवोन्मेषकांना दिशा देणारी ठरणार आहे.


शिवाजी विद्यापीठात ‘शिक्षण–उद्योग–शासन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Total Views: 28