बातम्या
वैशाख पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात उजळले शिवाजी विद्यापीठाचे रुप.
By nisha patil - 2/5/2026 4:01:35 PM
Share This News:
वैशाख पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात उजळले शिवाजी विद्यापीठाचे रुप.
वैशाख पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांमध्ये उज्ज्वल आणि शीतल मानली जाते. काल, शुक्रवारी (दि. १ मे) वैशाख पौर्णिमेच्या या तेजस्वी चंद्रप्रकाशामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व प्रांगण असे शुभ्रधवल होऊन गेले. या छायाचित्रणाच्या रुपाने प्रथमच रात्रीच्या प्रकाशात उजळलेल्या शिवाजी विद्यापीठाचे देखणे रुप सामोरे येत आहे.
·छायाचित्र संकल्पना: डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
·ड्रोन फोटोग्राफी: सुविज मूव्हीज, कोल्हापूर
मित्र हो,
कालच्या वैशाख पौर्णिमेच्या रात्री शिवाजी विद्यापीठाचे काही विशेष फोटो काढून घेतले आहेत. प्रथमच अशा प्रकारची फोटोग्राफी करवून घेतली आहे. मुख्य इमारतीचे सर्व दिवे मालवून ते काढण्यात आले आहेत. आपल्याला हे फोटो आवडतील, अशी आशा आहे. कृपया योग्य प्रसिद्धीसाठी.
वैशाख पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात उजळले शिवाजी विद्यापीठाचे रुप.
|