बातम्या
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील २४ विद्यार्थ्यांचा SET परीक्षेत यश
By Administrator - 8/9/2025 4:14:44 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील २४ विद्यार्थ्यांचा SET परीक्षेत यश
कोल्हापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा (SET) - मॅथेमॅटिकल सायन्सेस या परीक्षेत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या संख्याशास्त्र अधिविभागातील तब्बल २४ विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकाच अधिविभागातील इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवणे ही अभिमानास्पद बाब आहे.
विशेष म्हणजे सध्याच्या (2023-25) बॅचमधील ८ विद्यार्थ्यांनीही ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिविभागाचा लौकिक वाढविला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
गायत्री सुधीर सावंत, आकांक्षा उत्तम शेलार, अमृता बाबुराव पाटील, शैजल शहाजी मगदूम,पल्लवी आनंदा शेजवळ , सुशांत केदारी पाटील, गौरव केशव दळवी, वैश्नवी विश्वास जाधव, जागृती जितेंद्र कदम, प्रथमेश शिवानंद एकल,स्नेहल महादेव झरेकर, शुभम सुरेश कांबळे, रुतुजा सुधाकर पांढरे, मोनिका अण्णासाहेब कांबळे, विशाल बापू झिटे, प्राची धनाजी खिलारे, स्नेहल विठ्ठल कचरे, वर्षाराणी रामदास साळुंखे, चंद्रदीप साताप्पा बरकळे, धनश्री सुरेश कांबळे, तुषार शिवाजी कांबळे, काजल महेबुब नदाफ, अभिजीत नामदेव पवार आणि अमर हनमंत टिकोलें.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत असून, अधिविभागप्रमुख, प्राध्यापक व सहविद्यार्थ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील २४ विद्यार्थ्यांचा SET परीक्षेत यश
|