बातम्या
“शिवाजी विद्यापीठ राज्यात ‘सेवाशिस्त’ अव्वल; प्रशासकीय मूल्यांकनात दुसरा क्रमांक”
By nisha patil - 11/18/2025 4:26:17 PM
Share This News:
“शिवाजी विद्यापीठ राज्यात ‘सेवाशिस्त’ अव्वल; प्रशासकीय मूल्यांकनात दुसरा क्रमांक”
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील तेरा अकृषी विद्यापीठांचे प्रशासकीय मूल्यांकन नुकतेच जाहीर केले असून, शिवाजी विद्यापीठाने तब्बल १०० पैकी ६६ गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सेवापुस्तक अद्ययावत आणि डिजिटल करणाऱ्या प्रक्रियेत विद्यापीठाने सर्वाधिक कामगिरी केली असून, या विभागात २० पैकी २० गुणांची परिपूर्ण कमाई केली आहे.
‘सेवाकर्मी’ कार्यक्रमांतर्गत नऊ महत्त्वाच्या निकषांवर हे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये
सर्व संवर्गाची ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणे,
पदोन्नतीने नियुक्ती,
अनुकंपा नियुक्ती
या प्रत्येक निकषांमध्ये विद्यापीठाने १० पैकी १० गुण मिळवत प्रशासकीय अचूकता दाखवली.
बिंदूनामावली प्रमाणीकरणात विद्यापीठाला ८ गुण मिळाले. मात्र, सेवा प्रवेश नियम आणि सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती या विभागात प्रत्येकी ४ गुण मिळाल्याने थोडी पडझड झाली; तसेच आकृतीबंध आणि आयजीओटी पोर्टलवरील नोंदणी या श्रेणींमध्ये गुण मिळाले नाहीत.
यंदाच्या मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठाने ६८ गुणांसह प्रथम, तर मुंबई विद्यापीठाने ६६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला असून, शिवाजी विद्यापीठानेही त्याच गुणसंख्येसह उल्लेखनीय स्थान पटकावले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी रुजवलेली प्रशासकीय शिस्त आणि परंपरा आजही विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अबाधित राखली असल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या यशात सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे मोलाचे स्थान आहे.
राज्यात अशा प्रकारचे प्रशासकीय मूल्यांकन पहिल्यांदाच करण्यात आले असून, शिवाजी विद्यापीठाने आपल्या शिस्तबद्ध, पारदर्शक आणि डिजिटल व्यवस्थापनाची ठसा उमटवला आहे.
“शिवाजी विद्यापीठ राज्यात ‘सेवाशिस्त’ अव्वल; प्रशासकीय मूल्यांकनात दुसरा क्रमांक”
|