शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठाचा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर
By nisha patil - 8/13/2025 3:16:01 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाचा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर
कोल्हापूर | ११ ऑगस्ट — शिवाजी विद्यापीठाचा दोन वर्षातून एकदा दिला जाणारा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर झाला आहे. पुरस्कारामध्ये ₹५१,००० रोख, मानपत्र, शाल व स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.
पुरस्कार सोहळा २० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. विद्यापीठ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पार पडणार आहे. अर्थशास्त्र क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
शोध समितीच्या अध्यक्षपदावर डॉ. शिर्के असून सदस्यांमध्ये डॉ. महादेव देशमुख, प्रा. जे. ए. यादव, डॉ. विजय ककडे व डॉ. राहुल म्होपरे यांचा समावेश आहे. आयोजन अर्थशास्त्र अधिविभाग व शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन यांनी केले आहे.
डॉ. नरेंद्र जाधव — प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व धोरणतज्ज्ञ असून, ते रिझर्व्ह बँकचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, नियोजन मंडळाचे माजी सदस्य आणि राज्यसभेचे माजी सदस्य राहिले आहेत.
शिवाजी विद्यापीठाचा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर
|