खेळ

शिवाजी विद्यापीठाचा ऋषी प्रसाद देसाई ठरला पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025 चा वेगवान धावपटू

Shivaji Universitys Rishi Prasad Desai becomes the fastest runner


By nisha patil - 2/12/2025 11:03:57 AM
Share This News:



जयपुर राजस्थान येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये सोमवार दिनांक 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर अखेर अथलेटिक्स स्पर्धेला सुरुवात झाली असून यामध्ये ट्रॅक आणि फिल्ड इव्हेंट चे प्रकार त्याचबरोबर 4× 100 मीटर रिले मुले आणि 4×400 मीटर मिक्स रिले इत्यादी प्रकार होणार आहेत.
आज पहिल्याच दिवशी शिवाजी विद्यापीठाने सुवर्णमय सुरुवात करत 100 मीटर धावणे या इव्हेंट मध्ये पुरुष विभागात ऋषी प्रताप देसाई याने 10.53 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदकासह या स्पर्धेतील वेगवान धावपटू होण्याचा बहुमान पटकावला
उद्या अथलेटिक्स मधील दुसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाचा मिक्स रेल्वेचा संघ सहभागी होत असून तीन व चार डिसेंबर रोजी ११० मीटर अडथळा रेस, ८०० मीटर धावणे,,भालाफेक, ३००० मीटर स्टीपल चेस, ४×१०० मीटर रिले रेस मध्ये शिवाजी विद्यापीठ सहभागी होणार आहे.

संघाचे प्रशिक्षक प्राध्यापक रामा पाटील व डॉ इब्राहिम मुल्ला तसेच संघ व्यवस्थापिका शिला मोहिते यांनी विद्यार्थ्यांचे सराव सत्र घेऊन योग्य मार्गदर्शन केले आहे व सर्व सपोर्ट स्टाफ ला आपल्या संघावर विश्वास असून सर्वच प्रकारात सर्वच खेळाडू पदक पटकावतील असा विश्वास व्यक्त केला आहे संघास पथक प्रमुख डॉ एन डी पाटील हे प्रोत्साहित करत असून आजच्या सुवर्णपदकांमुळे शिवाजी विद्यापीठाचा संघ 200 सहभागी विद्यापीठांमध्ये १० व्या क्रमांकावर आलेला आहे पथक प्रमुखांनी याबाबत पहिल्या पाचमध्ये क्रमांक पटकावण्याचा मनोदय व्यक्त केला
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी प्रभारी प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव कुलसचिव डॉ. विलास शिंदे व क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
.


शिवाजी विद्यापीठाचा ऋषी प्रसाद देसाई ठरला पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025 चा वेगवान धावपटू
Total Views: 26