बातम्या
*कॉ. शिवाजी गुरव यांचे गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयासमोर हलगीनाद व धरणे आंदोलन*
By nisha patil - 1/7/2026 12:01:46 AM
Share This News:
**कॉ. शिवाजी गुरव यांचे गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयासमोर हलगीनाद व धरणे आंदोलन*
*पुनर्वसनासाठी मिळालेल्या जमिनीवरील बेकायदेशीर बोजा कमी करण्यासाठी बेमुदत धरणे व हलगी नाद आंदोलन*
*आजरा(हसन तकीलदार)*:-गडहिंग्लज तहसील कार्यालयासमोर कॉ. शिवाजी गुरव यांनी पुनर्वसनात मिळालेल्या जमिनीवरील बेकायदेशीर बोजा कमी करण्यासाठी गडहिंग्लज तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु केले आहे.
आंबे ओहोळ धरणात जमीन बाधित झालेल्या धरणग्रस्तांना कडगाव, तालुका गडहिंग्लज येथील जमीन मिळाली त्या जमिनीच्या सातबारा पत्रकी इतर हक्कात बोजा चढवण्यात आला असून तो चुकीच्या पद्धतीने चढवण्यात आला आहे तो बोजा कमी करण्यासाठी दिनांक 27/2 /2025 पासून संबंधित कार्यालयाकडे अर्ज सादर केला आहे.
त्याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागवण्याच्या नावाखाली एक वर्ष झाले मात्र शेरा कमी झाला नाही प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 च्या पुस्तकातील पान नंबर 13 नुसार बाधित जमिनीच्या व पुनर्वसनात मिळाणाऱ्या जमिनीच्या 65 टक्के रक्कम दोन्ही पैकी जी कमी असेल ती भोगवटची रक्कम म्हणून शासनाकडे जमा करावी लागते. दोन्ही पैकी एकही रक्कम भरली नाही तर असा शेरा इतर हक्कात येणे उचित होते, मात्र गेलेल्या जमिनीचे 65 टक्के रक्कम ही भूसंपादन क्रमांक ६ कडे त्याचवेळी भरणा करून घेतली आहे मात्र पान नंबर तेरा वरील मजकुराचा गैर अर्थ काढून बोजा चढवण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिला आहे. इतर अधिकाऱ्यांनी वाटप आदेश दिलेले पाहून निर्णय घेणे गरजेचे असताना वेळ काढूपणा चाललेला आहे.
मागील निवेदनातुन येत्या आठ दिवसात बोजा कमी करावा अन्यथा दिनांक 30/6/2026 पासून गडहिंग्लज तहसीलदार कार्यालया समोर बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आज दि. 30/06/2026 पासून कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.
हलगीनाद करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले. यावेळी यश चौगुले, सदू शिवणे, नेताजी साठे,शिवाजी गजरे, कॉ. संग्राम सावंत यांनीही सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
*कॉ. शिवाजी गुरव यांचे गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयासमोर हलगीनाद व धरणे आंदोलन*
|