बातम्या

तृतीयपंथी सक्षमीकरणासाठी शिवानी गजबर यांचे उल्लेखनीय कार्य; ‘अस्तित्व सन्मान पुरस्काराने’ गौरव

Shivani Gajbars remarkable work for the empowerment


By nisha patil - 10/31/2026 9:36:36 PM
Share This News:



तृतीयपंथी सक्षमीकरणासाठी शिवानी गजबर यांचे उल्लेखनीय कार्य; ‘अस्तित्व सन्मान पुरस्काराने’ गौरव

मुंबई : तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवानी गजबर यांना प्रतिष्ठेचा ‘अस्तित्व सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबईतील द ललित हॉटेलमध्ये आयोजित ‘Power in Point – Edition Five’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
 

तृतीयपंथी व्यक्तींना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शिवानी गजबर सातत्याने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहेत.

विशेष म्हणजे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तृतीयपंथी लाभार्थ्यांसाठीची वैद्यकीय प्रमाणपत्राची अट रद्द करण्याच्या निर्णयात त्यांचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला. यासह तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी धोरणात्मक सुधारणा आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठीही त्या कार्यरत आहेत.
 

या पुरस्कार सोहळ्याला आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वर्षा गायकवाड, अभिनेते किरण कुमार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शिवानी गजबर यांच्या कार्याचा हा सन्मान तृतीयपंथी समुदायाच्या हक्क आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.


तृतीयपंथी सक्षमीकरणासाठी शिवानी गजबर यांचे उल्लेखनीय कार्य; ‘अस्तित्व सन्मान पुरस्काराने’ गौरव
Total Views: 22