ताज्या बातम्या
कष्टकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन.
By nisha patil - 12/12/2025 12:05:37 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- युनो मध्ये उच्च दर्जाची नोकरी, १९७७ साली चार अंकी असणारा भक्कम पगार सोडून शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी भारतामध्ये परतले. शेती विषयक धोरणे काय असावीत, सध्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायद्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणारे, स्वतः शेती विकत घेऊन त्यामध्ये स्वतः राबून कष्टकऱ्यांच्या व्यथा जाणणारे शिवाय पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट असा हातखंडा असणारे, त्याचप्रमाणे उत्तम राजकारणी, राजकारणातून समाजकारण यांची सांगड घालणारे अशा या महान विभूतीचा आज स्मरण दिवस.
खरं म्हणजे त्यांचे स्मरण शेतकऱ्यांना रोजच होत आहे. सर्वप्रथम संघटना बांधून शेतकऱ्यांना एका छताखाली आणण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता. त्याच्यामुळेच आज काही संघटना अन्यायाविरोधात आवाज उठवू लागल्या आहेत. अशा अवलियाला आज श्रद्धांजली वाहण्यात आली.
या अवलियाने जाताना देखील आपली बरीचशी संपत्ती घरामध्ये कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दान केली आहे. शेतकरी हा खरोखर दानतवान असतो, हे त्याने स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणले. कोणतेही सोशल मीडियाचे माध्यम नसताना त्यांनी 1980 व 90 च्या दशकात लाखो लोकांच्या सभा घेतलेल्या आहेत. सरकारला देखील अनेक कायदे करताना त्यांचा सल्ला घेणे भाग पडले होते. परंतु ते पूर्णपणे अमलात आणले नाहीत. स्वामीनाथन आयोगामध्ये शेतमाल उत्पादन खर्चा संबंधी सीटू चा समावेश करण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले होते.
अशा या महान विभूतीस सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मानवंदना देण्यासाठी शिवाजी माने, (अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना)यांनी भादोली येथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कष्टकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन.
|