बातम्या

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Shivarajyabhishekam Day celebrated


By nisha patil - 6/6/2025 3:39:56 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, उपकुलसचिव गजानन पळसे, डॉ. वैभव ढेरे, संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर, विद्यार्थी विकास विभागाच्या सुरेखा आडके, विजय इंगवले, शाहू सेना जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, करण कवठेकर, शशिकांत सोनुले, अथर्व कुराडे यांच्यासह प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
Total Views: 154