बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
By nisha patil - 7/6/2025 3:27:53 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
कोल्हापूर दि. 06 : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ आर. आर. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे यांनी केले. त्यानंतर इतिहास विभागप्रमुख डॉ. सिध्दार्थ कट्टीमनी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य् कारभार, आरमार विषयक धोरण, इत्यादी विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी विवेकानंद कॉलेजचे डॉ.ई.बी.आळवेकर, डॉ. जी.एस.उबाळे, श्री हितेंद्र साळुंखे, प्रबंधक श्री सचिन धनवडे, विवेकानंद कॉलेजचे ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होत.
विवेकानंद कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
|