विशेष बातम्या

कागलमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा;

Shivarajyabhishekam Day celebrated in Kagal


By nisha patil - 6/6/2025 3:30:23 PM
Share This News:



कागलमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा;

 मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागल शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने ग्रामविकास मंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बसस्थानकाजवळील अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आणि कागल नगरपालिकेच्या प्रांगणातील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

"छत्रपती शिवाजी महाराज की जय" च्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर, नगरसेवक, पदाधिकारी, आणि शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात राष्ट्रपुरुषांप्रती अभिमान आणि एकात्मता व्यक्त करत उपस्थितांनी महाराजांच्या विचारांचा जागर केला. कार्यक्रमात शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिवस्मारकांच्या सन्मानासाठी आयोजित हा कार्यक्रम कागलकरांसाठी गौरवाचा क्षण ठरला.


कागलमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा;
Total Views: 140