खेळ
वारणा बहिरेवाडीच्या शिवदुर्गा जाधवला राष्ट्रीय सुवर्णपदक
By nisha patil - 9/22/2025 11:44:04 AM
Share This News:
वारणानगर :
मुंबई येथे पार पडलेल्या सातव्या राष्ट्रीय ईशो ज्युदो स्पर्धेत वारणा बहिरेवाडीची शिवदुर्गा विशाल जाधव (विद्यार्थिनी – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) हिने चमकदार कामगिरी करत १९ वर्षांखालील ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
या उल्लेखनीय यशामुळे शिवदुर्गाची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या कामगिरीमुळे वारणा परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिवदुर्गाच्या यशामागे शाळेच्या संचालिका प्राचार्या सुस्मिता मोहनती, ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा विभाग प्रमुख विठ्ठल, तसेच प्रशिक्षक पैलवान विष्णू पुजारी, बॉबी
समर्थ काडगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच तिच्या वडिलांचे युवा उद्योजक विशाल जाधव, आई तेजल जाधव, आजोबा बाळासाहेब जाधव व आजी कांता जाधव यांचे मोलाचे पाठबळ तिला लाभले आहे.
वारणा बहिरेवाडीच्या शिवदुर्गा जाधवला राष्ट्रीय सुवर्णपदक
|