बातम्या

शिवगर्जना तरुण मंडळमार्फत विसर्जन मिरवणुकीत अघोरी तांडव नृत्याचा थरार

Shivgarjana Tarun Mandal


By nisha patil - 12/9/2025 11:26:13 AM
Share This News:



शिवगर्जना तरुण मंडळमार्फत विसर्जन मिरवणुकीत अघोरी तांडव नृत्याचा थरार


अंबप (प्रतिनिधी  किशोर जासूद):  अंबप  तालुका हातकणंगले येथे  शिवगर्जना तरुण मंडळमार्फत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आघोरी तांडव नृत्याचा थरार सर्वत्र आकर्षणाचा विषय ठरला विशेष म्हणजे यावर्षी सार्वजनिक गणेश मिरवणुकीत अघोरी कलाकारांचा एक वेगळाच व रोमांचक कारक अनुभव घेतला .

कलाकारांचे रंगवलेले अघोरी रूप रुद्र मुखवटे संपूर्ण अंगावरती भस्म राख व शंकराच्या रूपातील तांडव नृत्य पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती काळा रंग शस्त्र रूप त्रिशूल खडक जटा कवठीमाळ अशा विविध प्रतिकृतीद्वारे  हे नृत्य सादर केले गणपती विसर्जना दिवशी या मंडळाचा गावामध्ये चर्चेचा विषय ठरला शिवगर्जना तरुण मंडळमार्फत विसर्जन मिरवणुकीत अघोरी तांडव नृत्याचा थरार


शिवगर्जना तरुण मंडळमार्फत विसर्जन मिरवणुकीत अघोरी तांडव नृत्याचा थरार
Total Views: 94