बातम्या

मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकात संयुक्त शिवजयंती सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा

Shivjaynti mardani akhada


By nisha patil - 4/20/2026 1:30:02 PM
Share This News:



**मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकात संयुक्त शिवजयंती सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा*

आजरा (हसन तकीलदार)*:-इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे "राजे शिव छत्रपती ".

सालाबाद प्रमाणे यावर्षीही आजरा शहरात संयुक्त शिवजयंती सोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात अगदी उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. सकाळी शिवतीर्थावर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. शिवतीर्थावरील छत्रपतींच्या मूर्तीला आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी उपस्थित महिलासह शिवभक्तांनी पाळणा गीतासाह विविध गीते सादर केली.

 सायंकाळी 6:00वाजता व्यंकटराव हायस्कुलपासून मिरवणुकीला सुरवात झाली. आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व अण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचे हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. व्यंकटराव हायस्कुल पासून सुरु झालेली ही मिरवणूक ट्रॅक्टरमध्ये भव्य मूर्ती व पालखी मध्ये महाराजांची मूर्ती स्थापन करून बाजारपेठ,शिवतीर्थ, सोमवारपेठ, सुतारगल्ली, सीडफार्म, वाणी गल्ली येथून परत शिवतीर्थावर येऊन विसर्जित करण्यात आली.

बोलकेवाडीचे महिला लेझीम पथक आणि वेंगरूळ येथील मर्दानी खेळांची प्रत्यक्षिके यासारख्या पारंपरिक खेळांनी लोकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे जबरदस्त आणि आकर्षक आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी बामणे भाऊजी, संजयभाऊ सावंत, प्रभाकर कोरवी, आनंदा कुंभार, सुधीरबापू कुंभार, नौशादभाई बुडडेखान, असिफ सोनेखान, अरिफभाई खेडेकर, सौ. पूजा डोंगरे, माजी नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी -पाटील, विजयभाऊ थोरवत, युवराज पोवार, अभिषेक शिंपी, बाळ केसरकर, विलास नाईक, विजयकुमार पाटील, अनिकेत चराटी, परेश पोतदार, शरीफभाई खेडेकर, डॉ. स्मिता कुंभार, किरण कांबळे, संजय चव्हाण, अतुल पाटील,गौरव देशपांडे, मयूर कुंभार, अभिजित रांगणेकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वात अगदी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकात संयुक्त शिवजयंती सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा
Total Views: 167