बातम्या
करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
By nisha patil - 4/30/2025 11:06:59 PM
Share This News:
करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बाल हनुमान मित्र मंडळ शाखा क्रमांक ३ च्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. कार्यक्रमानंतर मंडळाच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी शरद माळी, दीपक रेडेकर, संतोष चौगुले, अरविंद शिंदे, योगेश लोहार, दत्तात्रय विभुते, राजेश गाताडे, गणेश माने आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
|