बातम्या
पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या कुटुंबीयांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे सांत्वन
By nisha patil - 9/25/2025 4:15:26 PM
Share This News:
पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या कुटुंबीयांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे सांत्वन
कोल्हापूर, दि. २५: सुप्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी डॉ. भोजे यांच्या पत्नी श्रीमती उमा, मुली वर्षा, विद्या, वीणा तसेच जावई अमित व गिरीश उपस्थित होते. राजेंद्र माने, नेमिनाथ चौगुले, उमेश माळी व ग्रामस्थही या प्रसंगी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, “कसबा सांगावचे सुपुत्र असलेले पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी भारतमातेसाठी अनुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक काळ महत्वाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक कर्तबगार संशोधक व अनुशास्त्रज्ञ गमावला आहे. त्यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
डॉ. भोजे यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा समितीवर भारताचे प्रतिनिधित्व केले होते. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.
मंत्री मुश्रीफ यांनी डॉ. भोजे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कुटुंबीयांना धीर दिला.
पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या कुटुंबीयांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे सांत्वन
|