बातम्या
गुरुवर्य प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
By nisha patil - 8/4/2026 4:23:59 PM
Share This News:
गुरुवर्य प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
आजरा (हसन तकीलदार)*:- - येथील चैतन्य सृजन सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि जे.पी. नाईक पतसंस्थेचे चेअरमन डॉ.प्रा. शिवशंकर उपासे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रा. श्रीकांत नाईक व टी. के. पाटील यांच्या त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, उत्तूर विख्यात स्वयंसेवी संस्थेने बहिरेवाडी येथील डॉ. जे. पी. नाईक स्मारक भवनात हा गौरव सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी श्रीपाद जोशी होते. डॉ. शिवशंकर उपासे यांनी आठवीपासून एम. ए. पी. एच.डी. पदवीपर्यंत अध्यापन व मार्गदर्शन व्रतस्थपणे केले आहे. बी. ए. एम. ए. (मराठी) साठी उपयुक्त बारा पुस्तकांचे गुणवत्तापूर्ण लेखन केले आहे. त्यातील त्यांच्या अनेक पुस्तकांचा महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत सातत्याने अनेक उत्तमोत्तम उपक्रम राबविले आहेत. त्यांनी संस्थात्मक कार्यातून शालेय विदयार्थ्यांसाठी केलेले प्रदीर्ष कार्य केले आहे.
त्यांनी मासिक ऋग्वेद चिल्डन रिलीफ फंडामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या अनेक कसदार पुस्तकांच्या प्रकाशन कार्यात सहाय्य केले आहे. डॉ. उपासे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रांत केलेल्या समाजोपयोगी कार्याचा विचार करून हा विशेष पुरस्कार त्यांना राम देशपांडे यांच्या हस्ते बहाल करण्यात आला आहे.
गुरुवर्य प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
|