बातम्या

शिवसेनेचा आरोग्य उपक्रम सुरू; रुग्णालयासाठी अद्ययावत उपकरणे देण्याची ग्वाही

Shivsema shinde


By nisha patil - 10/4/2026 3:10:22 PM
Share This News:



शिवसेनेचा आरोग्य उपक्रम सुरू; रुग्णालयासाठी अद्ययावत उपकरणे देण्याची ग्वाही

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा घेत, शिवसेनेचे गटनेते व दक्षिण विधानसभा प्रमुख श्री. शारंगधर देशमुख यांनी दर महिन्याच्या ९ तारखेला विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमाची आज पहिली सुरुवात कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात करण्यात आली.

यावेळी रुग्णालयातील एकूण कामकाजाचा आढावा घेत डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयातील अडचणी व आवश्यक गरजा जाणून घेण्यात आल्या. रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयाला आवश्यक असलेली अद्ययावत वैद्यकीय उपकरणे तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

या प्रसंगी उपमहापौर अक्षय जरग, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक अक्षय इंगवले, आशकीन अजरेकर, स्वरूप कदम, नगरसेविका संगीता सावंत, अनुराधा खेडकर, माजी नगरसेवक तात्या खेडकर, संजय सावंत, नेपोलियन सोनूवले तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 


शिवसेनेचा आरोग्य उपक्रम सुरू; रुग्णालयासाठी अद्ययावत उपकरणे देण्याची ग्वाही
Total Views: 19