बातम्या
शिवसेना (उबाठा) नाटळ विभागप्रमुखपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड
By nisha patil - 6/26/2026 1:46:35 PM
Share This News:
शिवसेना (उबाठा) नाटळ विभागप्रमुखपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड
सिंधुदुर्ग ✒️गवस शुभम : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नाटळ विभागप्रमुखपदी गुरुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुका संघटक राजू राठोड, शहरप्रमुख महेश कोदे, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पेडणेकर यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
शिवसेना (उबाठा) नाटळ विभागप्रमुखपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड
|