विशेष बातम्या
कोल्हापुरात ‘शिवस्वराज्य मंच’ची स्थापना; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी पक्ष भेटी
By nisha patil - 11/21/2025 5:45:23 PM
Share This News:
कोल्हापुरात ‘शिवस्वराज्य मंच’ची स्थापना; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी पक्ष भेटी
कोल्हापूर शहरातील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी ‘शिवस्वराज्य मंच – कोल्हापूर’ या नावाने नवीन हक्काचा मंच स्थापन करण्यात आला आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या पुढाकारातून हा मंच आकाराला आला असून, येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांमधून नेतृत्व उभे करणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे.
या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य मंचतर्फे शिवसेना आणि भाजप या पक्षांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी अधिकृत मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष, शिवसेना जिल्हाध्यक्ष, दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि मंत्र्यांना हे निवेदन दिले जाणार आहे.
यासाठीच्या भेटींची सुरुवात आज, शनिवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयातून होणार आहे. यापूर्वी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते दसरा चौक येथे एकत्रित जमणार आहेत.
पत्रकार बांधवांनी या उपक्रमाचे वार्तांकन करून योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोल्हापुरात ‘शिवस्वराज्य मंच’ची स्थापना; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी पक्ष भेटी
|