विशेष बातम्या

क्रिकेटचा बॉल काढताना शॉक! 13 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Shock while pulling out a cricket ball


By nisha patil - 6/12/2025 5:21:22 PM
Share This News:



क्रिकेटचा बॉल काढताना शॉक! 13 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

उजळाईवाडी विमानतळ रोड परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. क्रिकेट खेळताना टेरेसवर गेलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा हाय-व्होल्टेज विद्युतवाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला. मोहम्मद अफ्फान मोहम्मद आसिफ बागवान असे मृत मुलाचे नाव आहे.

ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हनुमंत खांडेकर यांच्या घराच्या टेरेसवर घडली. टीईटी शाळा बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी मिळाल्याने मोहम्मद सकाळी आई-वडिलांसोबत नाश्ता करून मित्रांसह क्रिकेट खेळण्यासाठी त्या परिसरात गेला होता.

खेळादरम्यान बॉल टेरेसवर गेल्याने तो आणण्यासाठी मोहम्मद वर गेला. परत येताना बंगल्यावरून जाणाऱ्या 11 केव्ही हाय-व्होल्टेज तारेचा स्पर्श त्याच्या गळ्याला झाला. जोराचा शॉक बसताच तो खाली कोसळला. आवाज ऐकताच परिसरातील नागरिक धावले आणि गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे पाठवला.

मोहम्मदच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. “आज शाळा सुरू असती, तर ही दुर्घटना घडली नसती,” अशी वेदनादायी भावना ग्रामस्थांनी मांडली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई-वडील व दोन बहिणींवर शोककळा पसरली आहे.


क्रिकेटचा बॉल काढताना शॉक! 13 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
Total Views: 13