बातम्या

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक बदल!

Shocking changes in Mahalaxmi Express


By nisha patil - 9/9/2025 1:57:49 PM
Share This News:



🚉 महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक बदल!

स्लीपरच्या ८० सीट्स कमी, एसी डबा वाढणार

कोल्हापूर–मुंबई मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना मोठा धक्का बसणार आहे. दि. १८ ऑक्टोबरपासून स्लीपरचा एक डबा कमी करून, त्याऐवजी एसी डबा जोडण्यात येणार आहे.

यामुळे स्लीपरच्या ८० सीट्स कमी होतील, तर एसीच्या तितक्याच सीट्स वाढतील. ३२० रुपयांचे स्लीपर तिकीट परवडणाऱ्या प्रवाशांना आता ७९० रुपयांच्या एसी तिकिटासाठी मोजावे लागणार आहे.

सध्या या गाडीत २१ डबे असून, त्यापैकी नऊ स्लीपर आहेत. बदलानंतर त्यांची संख्या फक्त आठ राहणार आहे.

सतत फुल्ल असणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये आधीच तिकीट मिळणे कठीण असताना, स्लीपर कमी झाल्याने वेटिंग यादी आणखी वाढणार आहे. प्रवासी नाराज होत विचारत आहेत.


महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक बदल!
Total Views: 94