विशेष बातम्या

"कोल्हापूर सब-जेलमधील धक्कादायक भ्रष्टाचार! 

Shocking corruption in Kolhapur sub jail


By nisha patil - 6/20/2025 6:44:09 PM
Share This News:



"कोल्हापूर सब-जेलमधील धक्कादायक भ्रष्टाचार! 

तंबाखू ५००, दारू २५ हजारांना ?

कायदेही गहाण?"

कोल्हापूरच्या सब-जेलमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. कायद्याच्या नावावर सुविधा देण्याचे रेट्स निश्चित केल्याचे उघड झाले आहे. तुरुंगात तंबाखूची किंमत तब्बल ५०० रुपयांपर्यंत, तर दारू मिळवण्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंतची मागणी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

आठ दिवसांची जुडीशियल कस्टडी भोगण्यासाठी एका गेलेल्या तरुणाने हा अनुभव कथितपणे सांगितला आहे. यामध्ये जेलमधील काही जुने कैदी आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप होत आहे.

कैद्यांना हव्या त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी ठराविक रक्कम वसूल केली जाते. तुरुंग व्यवस्थेतील ही काळी बाजू समोर येत असल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.


"कोल्हापूर सब-जेलमधील धक्कादायक भ्रष्टाचार! 
Total Views: 91