बातम्या

कोल्हापुरात धक्कादायक घटना : अंत्यसंस्कार झालेली महिला ११ दिवसांनी जिवंत परतली

Shocking incident in Kolhapur

By nisha patil - 1/8/2025 5:21:58 PM
Share This News:

कोल्हापुरात धक्कादायक घटना :  अंत्यसंस्कार झालेली महिला ११ दिवसांनी जिवंत परतली

कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे १९ जुलै रोजी बेपत्ता झालेल्या संजना ठाणेकर यांचा मृतदेह म्हणून २९ जुलै रोजी कृष्णा नदीत सापडलेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, ११ दिवसांनी संजना स्वतः गावात परत आल्या. त्या जिवंत असल्याचे समजताच कुटुंबीय आणि गावकरी हादरले. चौकशीत त्या घरगुती कारणांमुळे बारामती व तासगाव येथे गेल्याचे स्पष्ट झाले. खऱ्या मृत महिलेचा तपास पोलीस करत आहेत.

कोल्हापुरात धक्कादायक घटना : अंत्यसंस्कार झालेली महिला ११ दिवसांनी जिवंत परतली
Total Views: 108