बातम्या

पन्हाळ्यात धक्कादायक घटना : वॉचमनने केला पत्नीचा दगडाने ठेचून खून

Shocking incident in Panhala


By nisha patil - 4/2/2026 6:42:53 PM
Share This News:



 पन्हाळ्यात धक्कादायक घटना : वॉचमनने  केला पत्नीचा दगडाने ठेचून खून

प्रतिनिधी : पन्हाळा तालुक्यातील चंदवानी यांच्या बंगल्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बंगल्यात वॉचमन म्हणून कार्यरत असलेल्या मानसिक अस्वस्थ अवस्थेतील रमेश धडेल याने आपल्या पत्नी कांचन रमेश धडेल हिचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे.
 

प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे.
आरोपी रमेश धडेल याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे चंदवानी यांच्या बंगल्याच्या परिसरात शोककळा पसरली आहे.


पन्हाळ्यात धक्कादायक घटना : वॉचमनने केला पत्नीचा दगडाने ठेचून खून
Total Views: 160