बातम्या

मुख्यमंत्री यांच्या गावातच कंत्राटदाराची धक्कादायक आत्महत्या

Shocking suicide of contractor in Chief Ministers village


By nisha patil - 9/13/2025 3:40:55 PM
Share This News:



मुख्यमंत्री यांच्या गावातच कंत्राटदाराची धक्कादायक आत्महत्या

नागपूर (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तब्बल ३८ कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्यामुळे नागपूरचे कंत्राटदार प्रेमवच्छा वर्मा (वय ५८, साई कन्स्ट्रक्शन) यांनी आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्री यांचे गाव असलेल्या नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

शासनाच्या देयकविषयक धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना गेल्या एक वर्षापासून सातत्याने आंदोलन करत आहेत. यापूर्वीही जलजीवन मिशनचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी नेमक्या महिनाभरापूर्वी आत्महत्या केली होती.

या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनानंतर पुण्यात राज्यस्तरीय बैठक घेऊन या विषयाचा कायमचा तोडगा काढण्याचा निर्णय संबंधित संघटनांनी जाहीर केला आहे.


मुख्यमंत्री यांच्या गावातच कंत्राटदाराची धक्कादायक आत्महत्या
Total Views: 83