बातम्या
शॉर्टसर्किटने आग.. काजू झाडांचे व गवताचे नुकसान
By nisha patil - 2/3/2026 12:01:03 AM
Share This News:
**शॉर्टसर्किटने आग.. काजू झाडांचे व गवताचे नुकसान*
**आजरा (हसन तकीलदार)* शेतातून गेलेल्या विजेच्या खांबावरील वरील तारेंच्या शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत आल्याची वाडी व गवसे येथील सुळेटेक आणि कोलेरांगी टेक नावाच्या शेतामधील काजूच्याबागा आणि गवत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.काजूच्या झाडांना मोहोर आला होता. फळधारणा सुरु होती आणि या आगीमुळे काजुची झाडे होरपळून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे जनवरासाठी ठेवलेल्या गवतानेसुद्धा पेट घेतल्याने गवतही अगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये श्रीपती पेडणेकर, गणपती पेडणेकर, लक्ष्मण सोले, नंदकुमार पाटील, गणपती पाटील, रेमेत फर्नांडिस, बाळासाहेब माडभगत, अंकुश पेडणेकर, महादेव पेडणेकर, बाळु फराकटे, शंकर माडभगत, महादेव परीट इत्यादी शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आग लागल्याचे समजताच गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला आग विझविण्यासाठी गणेश इलगे, रुपेश माडभगत, लक्ष्मण सोले, श्रीपती पेडणेकर, बाळु माडभगत, संजय माडभगत, संभाजी नवार, लक्ष्मी इलगे, नामदेव माडभगत, शामराव माडभगत इत्यादी तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले.अशी माहिती सामाजिक कायकर्ते अविनाश हेब्बाळकर यांनी दिली.
शॉर्टसर्किटने आग.. काजू झाडांचे व गवताचे नुकसान
|