बातम्या
गोकुळच्या सभेत शौमिका महाडिक आक्रमक, माईक बंद झाल्याचा आरोप
By nisha patil - 9/9/2025 5:58:43 PM
Share This News:
गोकुळच्या सभेत शौमिका महाडिक आक्रमक, माईक बंद झाल्याचा आरोप
सभा शांततेत व खेळीमेळीत संपन्न : सतेज पाटील
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात पार पडली. गोकुळची सभा आणि गोंधळ हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे समीकरण कायम राहिल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.
सभेदरम्यान प्रश्नोत्तरांच्या वेळेस शौमिका महाडिक यांचा माईक अचानक बंद केला असल्याचा आरोप करत त्या आक्रमक झाल्या व नाराजी व्यक्त केली. “आधी 21 संचालक होते ते 25 का केले? सभासदांना माईक न देता बोलण्याची संधी का दिली नाही?” असा सवाल त्यांनी केला. यावेळी संचालिका शौमिका महाडिक यांनी संताप व्यक्त करत आपल्याला समाधानकारक उत्तरे मिळाले नसल्याचा आरोप केला.
दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी “गेल्या पाच वर्षांत चांगला कारभार केला असून दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिला आहे. याशिवाय ही सभा शांततेत व उत्साहात संपन्न झाल्याचे देखील ते म्हणाले. याशिवाय गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी यावर्षी गाईच्या व म्हशीच्या दुधाला राज्यात सर्वाधिक दर गोकुळ दूध संघ देत असून गोकुळच्या सभासदांच्या हिताचा विचार करूनच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.
एकंदरीत सभेत पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंगाचे चित्र दिसून आलं.
गोकुळच्या सभेत शौमिका महाडिक आक्रमक, माईक बंद झाल्याचा आरोप
|