बातम्या
श्रम फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त 'श्रमभूषण पुरस्कार २०२५' संपन्न...
By nisha patil - 4/28/2025 1:33:48 PM
Share This News:
श्रम फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त 'श्रमभूषण पुरस्कार २०२५' संपन्न...
सायकलपटू राम कारंडे यांचा विशेष सन्मान, विविध मान्यवरांची उपस्थिती
श्रम फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 'श्रमभूषण पुरस्कार २०२५' सोहळा छत्रपती शाहू स्मारक भवन येथे उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. सायकलवरून सामाजिक संदेश पोहोचवणारे सायकलपटू राम कारंडे यांचा ट्रॉफी व मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. शिवराज नाईकवाडे (सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती), मा. विजय ककडे (ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ) आणि पहिले पॅरा ऑलम्पिक सुवर्णपदक विजेते मा. मुरलीकांत पेटकर यांची उपस्थिती होती.
प्रमुख उपस्थितीत मा. सुनील नागावकर (सी.ए. आणि सुप्रसिद्ध वक्ते), मा. बाजीराव नाईक (अध्यक्ष, बहुजन परिवर्तन पार्टी), मा. भारत खराडे (संचालक, चाटे शिक्षण समूह) आणि मा. विद्यासागर पाटील (पॅटसन इंजिनिअर्स) यांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाचे आयोजन श्रम फाउंडेशनच्या सचिव वैशाली सारंग व अध्यक्ष कमलाकर सारंग यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने करण्यात आले.
श्रम फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त 'श्रमभूषण पुरस्कार २०२५' संपन्न...
|