शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘श्रावण धारा’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन संपन्न
By nisha patil - 8/13/2025 3:09:47 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘श्रावण धारा’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन संपन्न
कोल्हापूर दि. 13: येथील विवेकानंद कॉलेज मधील मराठी विभागाच्या वतीने विवेक भितीपत्रिकेच्या श्रावणधारा या विशेषांकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांनी भितीपत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या लेखन कलागुणांना व्यासपीठ मिळते. मराठी साहित्यातील निसर्ग कवितांचे वाचन आणि आकलन विद्यार्थ्यांनी करायला हवे. श्रावण महिन्याचा स्वानुभव स्वतःच्या शब्दात विद्यार्थ्यांनी मांडायला हवा. असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभागप्रमुख एकनाथ आळवेकर यांनी केले. आभार प्रा.डॉ. प्रदीप पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन ऋतुजा बिरांजे या विद्यार्थिनीने केले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘श्रावण धारा’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन संपन्न
|