बातम्या
श्रेयस हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन १५ ऑगस्टला उजळाईवाडीत होणार उपक्रम
By nisha patil - 12/8/2025 2:42:14 PM
Share This News:
श्रेयस हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन १५ ऑगस्टला उजळाईवाडीत होणार उपक्रम
कोल्हापूर – श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने, संजीवनी ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत, श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हनुमान नगर, उजळाईवाडी येथे पार पडणार आहे.
रक्तदान हे सर्वोत्तम दान असून यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. या शिबिरात सहभागी होऊन आपला मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात येणार आहे.
श्रेयस हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन १५ ऑगस्टला उजळाईवाडीत होणार उपक्रम
|